Monday, February 27, 2017

विज्ञान दिन विशेष




                              शर्टचा प्रवास 
      शाळेपासून ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तीपर्यंत साऱ्यांनाच शर्ट हा गरजेचा  असतो. पण या शर्टचा शोध किती जुना आहे हे तुम्हाला माहित आहे का? तस पाहिलं तर शर्टशी  मिळताजुळता कपडा जो शरीराच्या वरच्या भागाला झाकण्यासाठी उपयोगात येत असे. त्याच्या  अस्तित्वाचे खुप आधिपासुनचे असलेचे  प्रमाण मिळते.,मात्र यामध्ये सुधारणा झाली ती सोळाव्या शतकानंतर ... मध्यकाळात शर्ट हा आजप्रमाणेच कोट किंवा जॅकेटच्या खाली घातला जात असे आणि तो दाखवणे चांगले मानले जात नव्हते. त्यावेळी हे शर्ट कैदी,पश्चाताप करणारी  माणसेच घालत असे. त्या काळात शर्टच्या वरच्या बाजूला कॉलरसोबत गोल आकृती बनवण्याची पद्धत होती. सतराव्या शतकात शर्ट हि प्रदर्शनाची वस्तू मनाली जाऊ लागली. अठराव्या शतकातही घालण्यात येणार शर्ट लांब होता आणि त्याची उंची गुडघ्यापेक्षा  थोडी वर होती. त्यावेळी जी माणसे झोपताना शर्ट घालत नसत,त्यांना चांगले समजले जात नव्हते .एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला संपूर्ण शर्टचा रंग एकच होता. याच शतकात पहिल्यांदा असा शर्ट बनला जो रंगीत होता. मात्र, असे शर्ट मजूर आणि श्रमिक वर्गातील लोकच वापरत असण्याची पद्धत होती. यानंतर विसाव्या शतकात मात्र सर्व वर्गातील लोक रंगीत शर्ट घालू लागले. आता सुती, खादी, नायलॉन  सर्व प्रकारच्या कापडापासून शर्ट बनवले जाताच. शर्टाची लांबी कुर्त्यापेक्षाही लहान आणि टी-शर्टच्या तुलनेत छोटी असते. स्त्री आणि पुरुष दोघांच्या शरीराचा वरील भाग पूर्णपणे झाकला जाईल असा याचा आकार असतो त्याच प्रमाणे शर्ट घातल्यानंतर घालणाऱ्याला कुठलेही काम करताना हात, खांदे, मनगट, आधी शरीराच्या अवयांशी हालचाल करणे हि सोयीस्कर होते. म्हणूनच इतर अनेक पर्याय असताना देखील शर्टची जागा कोणीही घेऊ शकत नाही.   
=================================================

अशी तयार झाली आगपेटी 

                     फार पूर्वीच्या काळी अग्नी निर्माण करण्यासाठी दोन विशिष्ट प्रकारचे दगड घासले जात असत , पण यानंतर अग्नी निर्माण करण्यासाठी कुठला दगड वापरावा यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते पण; त्यात यश आले ते जॉन वॉकर या व्यापाऱ्याला. जॉन हे रासायनिक द्रव्यांचा व्यापार विक्री करायचे. त्याबरोबरच  वेगवेगळ्या द्रव्यांच्या गुणधर्माबद्दल त्यांना कुतूहलही होते म्हणून ते वेगवेगळे प्रयोगही करूनबघत असत. त्यांनी एक रसायन मिश्रण तयार केले. जवळ असणाऱ्या एका लाकडाच्या काठीन त्यांनी हलवले. त्यामुळे ते मिश्रण लाकडाच्या तुकड्याला चिकटले . थोड्या कामानंतर बाजूला फेकून दिले. फेकलेले लाकूड व दगड यांच्यात घर्षण होऊन तेथून धूर निघू लागला व लाकडाने पेट घेतला. हे पाहून जॉन यांना आश्चर्य वाटले . त्यांना निदर्शनास असे आले कि लाकडाला लागलेल्या मिश्रणामुळे तेथे अग्नी निर्माण झाला असावा . त्यानंतर त्यांनी हा प्रयोग पुन्हा पुन्हा करून पहिला . प्रयोगाच्या यशस्वीतेमुळे जॉन यांना खूप आनंद झाला . वास्तविक पाहता ते शास्त्रज्ञ नव्हते  ; पण केवळ निरीक्षण शक्तीने त्यांनी हा शोध लावला . हाडाचा व्यापारी असणारे जॉन यांनी मग ५० काड्या एका लहान डबीत भरून त्यात एक खडबडीत कागद ठेवला आणि त्यांनी या पेट्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला . आगकाडीच्या या प्रयोगात त्यांनी पोटेशियम क्लोरेट ,गंधक आणि कोळसा यांचे मिश्रण वापरले होते. पुढे यामध्ये आणखी सुधारणा झाली . आगपेटीच्या एका  बाजूला पिवळा फॉस्फरस लावला जाऊ लागला . डबीत खडबडीत कागद ठेवण्याचे काम कमी झाले... पण फॉस्फरसच्या थोड्याशा धक्याने काड्या पेट घेऊ लागल्याने ती पेटी खिशात ठेवणे धोक्याचे होऊ लागले. यात स्वीडनच्या लुंड स्टॉर्म नावाच्या शस्त्रज्ञाने सुधारणा केली आणि पिवळ्या फॉस्फरस ऐवजी तांबडा फॉस्फरस डिंकात बुडवून ते मिश्रण डबीच्या बाहेरच्या बाजूला लावले आणि मग सुरक्षित आगपेट्यांचा सर्वत्र प्रसार होऊ लागला... 


--------------******************************----------------****************----------------

लुई पाश्चर 

रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील अतिशय महत्वपूर्ण शोध लावणारे शास्त्रज्ञ म्हणून लुई  पाश्चर या फ्रेंच शास्त्रज्ञाचे नाव आदराने घेतले जाते. २७ डिसेंबर १८२२ रोजी त्यांचा जन्म झाला. खर तर लहान  असताना त्यांना चित्रकला आणि इतर कलांविषयांची जास्त आवड होती .त्यांच्या आवडीकडे बघता मोठेपणी ते शास्त्रज्ञ होतील, असे कोणालाही वाटले नव्हते. त्यांनी मोठेपणी कला आणि विज्ञान या दोन्ही शाखांमधील पदव्या संपादन केल्या आणि १८४७ मध्ये ते डॉक्टरेट झाले. पाश्चर यांचा महत्वाचा शोध म्हणजे, अन्नाची आंबण्याची क्रिया आणि तिचा मद्यनिर्मितीशी असणारा संबंध हा होय. या विषयाचा सखोल अभ्यास करून पाश्चरायझेशन या विशिष्ठ प्रक्रियेचा त्यांनी शोध लावला. दूध उकळेपर्यंत न तापवता एका विशिष्ठ तापमानापर्यंत तापवल्यास दुधाचा स्वाद बिघडत नाही आणि दूध नसत हि नाही. या मागचे कारण दूध नासण्यास कारणीभूत असलेला जंतू नष्ठ करण्यास ते विशिष्ठ तापमान पुरेसे असते, हे त्यांनी सप्रयोग दाखवून दिले . आज आपण दुधाच्या पिशव्यांवर पाहिल्यास त्यावर पाश्चरायईज्ड असे लिहलेले असते. यामागे पाश्चर यांचा शोधाचा सिद्धांत आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक रोगजंतूंचाही शोध लावला. बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूमुळेच रोग होतात, हि संकल्पना त्यांनी मंडळी. इतकेस नाही तर त्यावर प्रतिबंधात्मक लसीदेखील तयार केल्या. १८४९ च्या सुमारास फ्रान्समध्ये रेशमाच्या किड्यांवर एका विशिष्ठ रोगाची साथ सुरु झाली. नंतर ती जगभर पसरली त्यामुळे संपूर्ण रेशीम उद्योगाचं संकटात सापडला. या रोगाचा अभ्यास पाश्चर यांनी केला. अनेक निरीक्षणे केल्यानंतर त्यांना आढळले कि, एका विशिष्ठ प्रकारच्या जंतूमुळेच हा रोग झालेला आहे. त्यांनी रेशीम उत्पादकांना या जंतूंनी बाधित झालेली किड्यांची अंडी आणि बाधित न झालेली अंडी वेगळी करण्यास मदत केली. बाधित झालेली अंडी नष्ठ करून चांगल्या अंड्यामधून निरोगी आळ्यांचा
 जन्म होऊ लागतील. त्यामुळे या किड्यांवर असलेल्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पुढे त्यांनी कोंबड्या व इतर प्राण्यांवरील रोगांच्या लसीही तयार केल्या. संसर्गजन्य रोगाची लसही त्यांनी बनवली.इतकेच   नाही तर माणसांना होणारे कॉलरा, घटसर्प, क्षय, देवी आदी त्याकाळी भयावह वाटणाऱ्या रोगांवर लसी तयार केल्या. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे त्याच्या लाळेतून होणाऱ्या जंतूप्रसारामुळे रेबीज हा रोग होतो. त्या काळी या रोगमुळे अनेकजण मृत्युमुखी पडत. पाश्चर यांनी रेबीज वरही लस तयार केली. आपल्या संशोधना मुळे
लाखो माणसांचे आणि प्राण्यांचे प्राण या महान शास्त्रज्ञांनी वाचवले. 


 ******************* **********************************                                          पॅराशूटचा प्रवास 

पॅराशूट हा अलीकडे साहसी खेळाचा प्रकार बनला आहे. पण पॅराशूटचा शोध कसा आणि कधी लागला हे तुम्हाला माहित आहे का ? पॅराशूट हे फुग्याच्या सिद्धांतावर काम करत असते. याचे प्रदर्शन पहिल्यांदा फ्रांसच्या लुई लेनॉर्मड  यांनी १७८३ मध्ये केले. त्यांनी पॅराशूटच्या साहाय्याने एका उंच मनोऱ्यावर उडी मारून लोकांना आर्श्चयचकित केले होते. पॅराशूटचा इतिहास बराच जुना होय. इतिहासातील तपशिलानुसार १२व्या शतकामध्ये पॅराशूटचा वापर चीन आणि चीन आणि फ्रांसच्या सर्कसमधील कलाकारांनी केला होता. मात्र , पॅराशूटचा सिद्धांत पहिल्यांदा हंगेरीमध्ये राहणाऱ्या एका गणितज्ज्ञने १५९५ मध्ये प्रकाशित केला नाही. त्यानंतर अठराव्या शतकामध्ये फ्रेंचच्या जोसेफ मटगोलीफन या शास्त्रज्ञाने गरम हवेने उडणाऱ्या फुग्याचा शोध लावला. याचे परीक्षण पॅराशूटच्या साहाय्याने उंच इमारतीद्वारे जनावरांच्या मदतीने उडी मारून करण्यात आला होता. त्यानंतर याच आधारावर पॅराशूटचीनिर्मिती करण्यात आली. या प्रयोगानंतर जोसेफ यांनी पहिल्यांदा आपल्या घराच्या छतावर दुसऱ्या इमारतीच्या छतावर अशाप्रकारे उडी मारून पॅराशूटचा वापर केला आणि आपल्या शोधाबाबत लोकांना माहिती दिली. या प्रयोगानंतर  करामती दाखविणारे लोक पॅराशूटच्या साहाय्याने उंच इमारतीवरून उडी मारून लोकांचे मनोरंजन करत असे अठराव्या शतकात फुग्याच्यासाहाय्याने इंगिलस चॅनेल पार करणाऱ्या जेन पीरर बलानचड  यांनी पॅराशूटबाबत अधिक संशोधन केले. पॅराशुटद्वारे विमानातून आपत्कालीन परिस्थितीत पहिली उडी मारली गेली ती १४ जुलै १८०८ रोजी. वर्सोवा शहरात हि कृती करण्यात आली. हे आपातग्रस्त लँडिंग बलून मध्ये आग लागल्यानंतर करण्यात आले होते. यानंतर १९०८ मध्ये स्टॅबन्स यांनी पॅराशूट हे हवेत उडी मारल्यानंतर उघडले जाऊ शकते, हे प्रयोगाने सिद्ध केले आणि त्याचा वापर १९२०मध्ये केला .  पहिल्या महायुद्धात पॅराशूटचा वापर फारसा झाला नाही. आपातग्रस्त विमानातून पॅराशूटचा साहाय्याने उडी मारण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या पायलटने १९१६ मध्ये केला. त्यावेळी क्रुसाच्या सीमेवर उडी मारली होती . १९१७ मध्ये जर्मन आणिक इग्लंच्या वायुसेनेने पॅराशूट हे जीवनरक्षक म्हणून वापरायला सुरुवात केली. नंतर त्याचा वापर बऱ्याच देशामधील वायुसेनेने सुरु केला . त्यानंतर शत्रूंच्या देशातील महत्वपूर्ण ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी रुस ने पॅराशूटचा वापर सुरु केला. १९४१ मध्ये कॅनडाने पहिली पॅराशूट फोर्स तयार केली. 
दुसऱ्या महायुद्धत पॅराशूटचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला.  

***************************************************************************************************************************************************************************************************************************************************


सुरक्षित स्फोटकांचा शोध 

आल्फ्रेड नोबेल हे रसायनशास्त्राचे मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी आपल्या गडगंज संपत्तीच्या व्याजातून पाच नोबेल पारितोषिके देण्याची इच्छा व्यक्त केली असल्यामुळे दरवर्षी हि पारितोषिके त्यांच्या नावाने दिली जातात. तेच नोबेल पारितोषिक या नावाने ओळखले जातात. जगभरात अतिशय प्रतिष्ठित असे हे पारितोषिक मानले जातात.आल्फ्रेड नोबेल यांनी काही रासायनिक स्फोटकांची निर्मिती केली . हि स्फोटके म्हणजेच योग्य तेव्हा आणि हवा तेवढाच स्फोट करण्यासाठी योग्य ठरावीत म्हणून त्यांनी खूप अभ्यास केला आणि भरपूर प्रयोग केले. अतिशय चिकाटीने  संशोधन करत असताना त्यांनी सुरक्षितपणे हाताळता येतील अशा बऱ्याच रासायनिक स्फोटकांची निर्मिती केली. ट्रायनायट्रो ग्लिसरीन हे स्फोटक मुळात द्रव्यास्थितीत होते. ते घण   स्वरूपात आण्यासाठी  त्यांनी बर्लिनजवळील किसेलगुहार नावाची विशिष्ठ माती वापरली. यांमुळे द्रव घनरूपात आले आणि ते हाताळणे सोपे झाले. त्यांनी निर्माण केलेल्या ब्लास्टिंग जिलेटीन या स्फोटकाची निर्मिती अशाच एका प्रयोगादरम्यान नकळतपणे झाली. हा शोध अपघातानेच लागला. एकदा नोबेल हे त्यांच्या प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना त्याच्या बोटाला जखम झाली. त्यांनी त्यावर कोलोडींन नावाचे रसायन लावले थोड्या वेळाने बघितलं  तर  जखमेवर एक पापुद्रा तयार झाला होता आणि रक्त येणे थांबले होते. हि युक्ती ट्रायनायट्रो ग्लिसरिन या द्रवाचे घनरूपात परीवर्तन करण्यासाठी वापरण्याची ठरवले.  त्यांनी या द्रव मध्ये कोलोडीं टाकून जिलेटीन मिळवले आणि हाताळण्यासाठी अतिशय सुविधाजनक असणाऱ्या नव्या स्फोटकांचा जन्म झाला . खडक फोडण्यासाठी या स्फोटकांचा वापर होऊ लागला . स्फोट करून खडक फोडण्याची प्रक्रिया  होत असल्याने नोबेल यांनी या स्फोटकाला ब्लांस्टिंग जिलेटीन असे नाव दिले यातून मिळालेल्या संपत्तीचा विनियोग संशोधन कार्यासाठी काम करणाऱ्यांना व्हावा म्हणून त्यांनी अशाना पारितोषिक देण्याची इच्छा व्यक्त केली होती .   

                 
***************************************************************************************************************************************************************************************************************************************************



बुध-शुक्र हे पहाटे आणि संध्याकाळीच का दिसतात ?

  सूर्यमालेच्या रचनेनुसार पृथ्वीच्या दृष्टीने बुध आणि शुक्र हे ग्रह अंतग्रह आहेत . पृथ्वीच्या भ्रमणाची कशा दोन्ही ग्रहांच्या बाहेर आहे. बुद्ध आणि शुक्र सूर्याभोवती भ्रमण करत असताना या दोघांचा सूर्याशी आणि नंतर पृथ्वीशी होणार कोन वारंवार बदलत असतो . बुध , पृथ्वी आणि सूर्य किंवा शुक्र, पृथी आणि सूर्य यांच्यामधील कोणाला 'इनंतर'  असे म्हणतात. पृथ्वीच्या दृचथिने बुध किंवा शुक्र सूर्याच्या समोर किंवा सूयरच्या मागे असेल तर अशा वेळी इनंतर शून्य असते. या दोन ग्रहांच्या भ्रमणात दोन वेळा इनंतरची किंमत सर्वात जास्त होती यलचह परम इनंतर असे म्हणतात . बुधाचे परम इअनंतर २८अंश तर शुक्राचे ४७ अंश आहे त्यामुळे बुद्ध आणि शुक्र पूर्व किंवा पश्चिम क्षितीजाच्या वर जास्तीत जास्त २८ आणि ४७ अंशापर्यंत दिसू शकतात . एकदा सूर्याने आकाशात पदार्पण केले कि इअनंतर कितीही असले तरीही इतर ताऱ्यांप्रमाणे हे दोन ग्रह आकाशात दिसत नाहीत. तसेच इनंतर १०अंशापेक्षा कमी झाल्यासही कोणताही ग्रह पहाटे किंवा सायंकाळीसुद्धा आकाशात दिसणार नाही सूर्याच्या संदरर्भात पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे इअनंतर मोजण्याची पद्धत आहे.सूर्याच्या आधी उगवणारा ग्रह पहाटेच्या वेळी आकाशात दिसणार हे उघड आहे . म्हणजेच पश्चिमइनंतर असणारा ग्रह पहाटे आकाशात दिसतो सूर्यानंतर उगवणारा ग्रह साहजिकच सूर्यप्रकाशामुळेदिसत नाही पण सूर्याचा अवास्तव अस्त झाल्यानंतर काही वेळाने तो अस्ताला जात असल्यामुळे पूर्वइनंतर असलेला ग्रहसायंकाळी सूर्याच्या अस्तानंतर दिसतो. 

***************************************************************************************************************************************************************************************************************************************************

नोबेल मानकरी – सी. व्ही. रामन

नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

 रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र 

किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय 

कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो.


सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. 

त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना

 भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये 

भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही 

देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे 

सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. 


१९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम 

केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

 रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते 

ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ

 भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला 

जातो.


डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) १९२८ फेब्रुवारी २८ या दिवशी जाहीर केले . पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो. १९८७. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी १९८७ रोजी साजरा करण्यात आला होता. सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
रामन परिणाम: प्रकाशाचा किरणांमध्ये वातावरणातील विविध कणांमुळे किंवा मूलद्रव्यामुळे प्रकाशाच्या तरंगलांबीमध्ये बदल होतो. जेव्हा प्रकाशाचे किरण कणरहित पारदर्शक रासायनिक मूलद्रव्यामधून प्रवास करतो, त्या वेळी प्रकाशाच्या किरणांच्या दिशांमध्ये बदल होतो. त्यातील अधिक प्रमाणातील प्रकाशाची तरंगलांबी बदलत नाही. त्यातील काही किरणांची तरंगलांबी मूळ प्रकाश किरणापेक्षा वेगळी असते. याला रामन परिणाम या नावाने ओळखले जाते. प्रकाशकिरण अत्यंत सूक्ष्म कणांवर पडल्यानंतर सर्व दिशांना विखुरतो. याला प्रकाशाचे विकिरण म्हणतात. आकाश निळे दिसण्याचा संबंध सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून प्रवास करताना होणाऱ्या विकिरणाशी आहे. सर्वांत कमी तरंगलांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे जास्त प्रमाणात विकिरण तयार होतात. विकिरण झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांना दिसल्याने आकाश निळे भासते. पूर्वी असे मानले जाई, की आकाशाच्या निळ्या रंगाच्या परावर्तनामुळे समुद्राचे पाणी निळे दिसते. यावरही रामन यांनी पाणी आणि बर्फामधून होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणांचा अभ्यास करत समुद्राच्या निळाईचे कारण प्रकाशाचे पाण्याच्या रेणूमुळे होणारे विकिरणच असल्याचे दाखवून दिले. या संशोधनानंतर प्रकाशाच्या विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधी, रचनेविषयी भांडार खुले झाले. रासायनिक संयुगाची रचना ठरविण्यामध्ये रामन परिणामाची मोलाची मदत झाली. दोन हजारापेक्षा अधिक रासायनिक संयुगांची रचना निश्‍चित करणे शक्‍य झाले. पुढे लेसर किरणांचा शोध यातून लागला. पुढे दोन वर्षांत झालेली दहा हजारांपेक्षा अधिक संशोधने रामन परिणामावर अवलंबून होती. आपल्या रोजच्या जीवनातही सिग्नलच्या दिव्यांचे रंगासारख्या अनेक बाबी या प्रकाशाच्या विकिरणानुसार ठरवलेल्या असतात.
————————————————————————————————————-
विज्ञानप्रसारासाठी काय करता येईल? समाजात विज्ञानप्रसाराची आत्यंतिक गरज लक्षात घेता संबंधित उपक्रम विज्ञान दिनापुरते मर्यादित नसावेत. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वैज्ञानिक माहितीची मांडणी केली जावी. विशेषतः मराठी आणि हिंदीतूनही वैज्ञानिक माहिती दिली जावी. उपक्रमांमधील तोचतोपणा टाळून अधिक आकर्षक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत. सोशल मीडियाचाही आधार घ्यावा. संशोधन संस्थांनी वर्षातून एक विज्ञान दिन राबविण्यापेक्षा महिन्यातून एक असा विज्ञान दिन राबवला, तर अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत विज्ञान पोचू शकेल आणि विज्ञान दिनाची उद्दिष्टे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकतील. प्रत्येक संशोधन संस्थेत स्वतंत्र विज्ञानप्रसार विभाग असावा. ज्याच्या माध्यमातून आपल्या विषयाचे ज्ञान सातत्याने सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येईल.
5555555555555555555555555555555555555555555
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
क्रांतिकारी संशोधक गॅलिलिओ 
२५ ऑगस्टला जगभरातील शास्त्रज्ञांनी व शास्त्रविषयाबद्दल रुची असलेल्या लोकांनी एक आगळावेगळाच वाढदिवस साजरा केला होता. तो म्हणजे जगातल्या पहिल्या दुर्बिणीचा ४००वा वाढदिवस. प्रख्यात इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांनी इ.स. १६०९ मध्ये प्रख्यात व क्रांतिकारी दुर्बीण तयार केली होती. गॅलिलिओला जन्म १५ फेब्रुवारी १५६४ ला इटलीमधील पैसा या गावामध्ये झाला. त्याने गणित व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला. इ. स. १५८९ पिसा विद्यापीठात ते  गणिताचे  प्राध्यापक बनले . चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले खाचखळगे, गुरुचे चंद्र याचे त्यानी  निरीक्षण केले. त्यावेळी पृथ्वीही विश्वाच्या मध्यभागी  असून सूर्य व बाकी ग्रह तारे पृथ्वीभोवती अशी समजूत होती. शुक्राला चंद्राप्रमाणेच कला आहे असे निरीक्षण केल्यावर गॅलिलिओला आढळून आले जर शुक्र आणि सूर्य दोन्ही पृथ्वी भोवती फिरत असले तर हे शक्य नव्हते यामुळे  गॅलिलिओने मतपरिवर्तन झाले व सूर्याभोवती पृथ्वीसह सर्व ग्रह फिरत असले पाहिजेत या कोपर्निकस या शास्त्रज्ञाने मानलेल्या अनुमानापर्यंत तो आला. इ. स. १६१४ पासून केथोलिक चर्चने, गॅलिलिओला त्याचे पाखण्डी विचार मांडण्यास मनाई केली होती तरीही त्याने जगाच्या बांधणीचे दोन सिद्धांत या नावाचे एक पुस्तक प्रसिद्ध केले. या पुस्तकाने गॅलिलिओने, कोपर्निकसचा सिद्धांत कसा जास्त योग्य वाटतो हे अप्रत्यक्षरीत्या सूचित केले होते. स्वतः पोप, गॅलिलिओ चा उत्तम मित्र होता. तरीही  चर्चच्या अधिकृत विचारांच्या विरुद्ध विचार प्रसिद्ध करण्याबद्दल १६३२ मध्ये आयुष्यभराची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आपल्या मनगटावरील नाडीचे ठोके दर मिनिटाला ८० असे पडतात त्याच उपयोग करून त्याने झुंबरांच्या आंदोलनाचा वेळ मोजून पहिला, एका दोरीला जाडशी गोटी बांधून त्याने प्रयोग केला. दोरीची लांबी कायम ठेऊन त्याने वजनात फरक करून पाहिला पण आंदोलनाच्या वेळात बदल झाला नाही. हेच तत्त्व लंबकाच्या घड्याळात आहे. हा शोध लावला. गुरुत्वमध्यावर त्यांनी  असाच संशोधन लेख लिहला आणि ते  शास्त्रज्ञ म्हणून ओळखले  जाऊ लागले . पिसा विद्यापीठात ते  गणिताचे  शिक्षक म्हणून काम करू लागले . हलक्या पदार्थापेक्षा जड पदार्थ जास्त वेगाने पृथ्वीवर खाली येतात. हे अरिस्टोटलचे म्हणणे, त्यांनी  पिसा येथील झुकलेल्या मनोऱ्यावरून चूक कसे आहे हे दगडांचा प्रयोग करून सर्वांना दाखवला.पदार्थ उंचावरून खाली पडत असता त्याचा खाली पडण्याचा वेग सारखा वाढत जातो हा शोध यांनी  या वरून लावला. गॅलिलिओने असे अनेक शोध लावले. यांनी  तापमानमापक यंत्र शोधून काढले.  दुर्बिणीचा शोध लावला. अर्क केंद्रताराच्या लहानमोठ्या दुर्बिणी  तयार केल्या.  आपल्या दुर्बिणीतून गुरुग्रहाचा शोध लावला. सूर्य,चंद्र आणि ग्रह फिरतात. आणि पृथ्वी स्थिर आहे ह्या बायबलच्या सांगण्याला त्याने प्रयोग करून खोटे पाडले;पण बायबल धर्म ग्रंथावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी या बद्दल ६महिने कैदीत टाकले. सुटल्यावर तो एका खेडेगावी गेला. त्या खेडेगावीच अखेरीस ८जानेवारी रोजी ते  मरण पावले.

***************************************************************************************************************************************************************************************************************************************************
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल

दूरध्वनी यंत्राचा {टेलिफोन} शोध लावला

जन्मदिन - ३ मार्च १८४७

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.
बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले.
मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.
कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.
दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.

उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.
१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.⁠⁠⁠⁠


----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                        चिनीमाती कशी तयार होते ?                                                     
                           मित्रांनो, आपल्या घरात काप-बशी, बाउल डिनरसेट अशा कितीतरी वस्तू चिनीमातीपासून बनवलेल्या बघत असतो. चिनीमाती कशी बनवतात, कशापासून बनवतात तुम्हाला माहित आहे का ? जमिनीत सापडणाऱ्या अशुद्ध ऑम्युमिनीअम, सिलिकेटसला चिनीमाती म्हणतात. अनेक वर्षांपासून चिनी लोक या मातीचा उपयोग भांडी तयार करण्यासाठी करायचे म्हणून त्याला चिनीमाती हे नाव पडलं असावं हि माती भारतात ब्राझील, बल्गेरिया, फ्रान्स, इराण, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा बऱ्याच ठिकाणी आढळते ज्वालामुखीमुळे तयार झलेल्या खडकावर हवेचा परिणाम होऊन त्याची ओलसर, चिकट माती तयार होते . ही माती ३००अंश सेल्सिअस पर्यंत तापवली  तर तिचा चिकटपणा निघून जातो आणि ती टणक  बनते. या तापवलेल्या  मातीपासून, शेगड्या,पाईप, टाईल्स,बरण्या ,इ. वस्तू बनवतात या मातीवर आम्लाचा किंवा आम्लारीचा परिणाम होत नाही. म्हणून आपण दही., लोणचे असे आंबट पदार्थ ठेवण्यासाठी या मातीच्या भांड्याचा वापर करतो शिवाय हि भांडी चटकन स्वच्छ होतात. फार वेळ घासत बसावे लागत नाही. अलीकडे तर चिनीमातीच्या उंची आकर्षक भांड्यांना खुप  मागणी आहे. मोठं मोठ्या मेजवान्यांमध्येही अशी भांडी वापरणे  श्रीमंतीचे लक्षण मानले जाते.    

****************************************************************************************************************************************************************** 


सूक्ष्मशरीरशास्त्राची पायाभरणी 
सूक्ष्मशरीर शास्त्रज्ञ मार्सेलो मालपीगी यांनी मानवी व कीटकांच्या शरीरातील विविध अवयवांचा कीटकांच्या गर्भावस्थेच्या निरीक्षण, संशोधन करून सूक्ष्मशरीरशास्त्राची पायाभरणी केली. मार्सेलो यांचा जन्म १६६८मध्ये १०मार्च या दिवशी इटलीतील एका गावात झाला. लहानपणापासून विद्याध्यनाची  आवड असणाऱ्या मार्सेलोने आपल्या माता-पित्याच्या मृत्यू नंतरही शिक्षण सुरु ठेवले. त्यांनी तत्त्वज्ञान व वैदकशास्त्रात बोलोण्गविद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. पिसा विद्यापीठात  त्यांनी आपले संशोधन सुरु केले . वैद्यकीय प्रश्नांबाबत त्यांनी प्रस्थापितांना प्रश्न विचारून खळबळ निर्माण केली. यामुळे मार्सेलोला राजीनामा द्यावा लागला. ते पुन्हा बॉलोग्ना विद्यापीठात आले. १६६१ मध्ये त्यांनी प्रथमच फुफ्फुसांतील निळा व रोहिण्या यांना जोडणाऱ्या सूक्ष्म केशवाहिन्या असतात हे सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने दाखवून दिले. विज्ञानातील हा खूप महत्त्वाचा शोधाचा टप्पा होता रोहिणीतून नीलेमध्ये कशाप्रकारे येते. यामागचे कारण मार्सेलोच्या पूर्वीचे शास्त्रज्ञ सांगू शकले नव्हते. रोहिणी आणि निलांना जोडणाऱ्या अतिसूक्ष्म केशवाहिन्यांच्या अस्तित्त्व सूक्ष्मदर्शकयंत्राच्या  खाली दाखवल्यामुळे मार्सेलोने १५०० वर्षांपासून मानल्या जात असलेल्या वैद्यकीय सिद्धांतांना धक्का दिला. त्या सिद्धांतानुसार रोहिण्यांमधील रक्त मोकळ्या जागेत जाते आणि त्या पासून शरीराचे अवयव बनतात , या प्रस्थापित विचारला धक्का बसल्यामुळे त्या वेळच्या तज्ज्ञांनी मार्सेलोवर प्रचंड टीका केली. या विरोधाला कंटाळून शेवटी मार्सेलो सिसिली येथील व्हेसिना विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आपला व्यवसाय सुरु असताना त्यांनी सूक्ष्मदर्शीयस संशोधन  सुरूच ठेवले. चवीचे संवेदन ग्रहण करणारे मज्जातंतू जिभेतील उंचवट्यांमध्ये असते, हे त्यांनी दाखवले तसेच रक्ततातील लाल पेशी त्यांनीच प्रथम सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्या या पेशींमुळेच रक्ताला लाल रंग येतो असा विचार हि त्यांनी मांडला. या व्यतिरिक्त मेंदू, यकृत प्लिहा, मूत्रपिंड हाडे, त्वचा या अवयवाचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करून त्याची अचूक निरीक्षणे मांडली  या बरोबरच त्यांनी अनुमान काढले कि आपल्या शरीरातील बहुसंख्य अवयव म्हणजे अतिशय सूक्ष्म अशा पेशींचा समूह होय. फलित अंड्यापासून कोंबडीचे पिल्लू बनवण्याच्या गर्भावस्थेतील निरनिराळ्या टप्प्यांचा अभ्यास हि त्यांनी केला. वनस्पती आणि प्राणी यांच्या रचनेतील तुलनात्मक अभ्यास केला. मार्सेलो यांनी संशोधनात मोठे नाव मिळवले असले तरीही त्यांना स्थानिक विरोध तीव्र होता. १६८४ मध्ये त्यांचे घर जाळण्यात आले. त्यांची अभ्यासाची उपकरणे, कागदपत्रे नष्ट ; करण्यात आली पण मार्सेलो हरले नाहीत. आपला अभ्यास त्यांनी सुरूच ठेवला आणि वैद्यकीय संशोधनात खूप मोलाची भर घातली.
******************************************************************************************************************************************************************












1 टिप्पणी(ण्या):

अतिशय सुंदर ! ब्लॉग ! !

Post a Comment