बोधकथा

एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.


मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".

मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."

बोध-  उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....

====================================================================
======================================================================
 
 ==========================================================================

एक छोटी सी प्रेरक कथा


___अतीत कभी नहीं भूला___

बिल गेटस सुबह के नाश्ते के लिए एक रेस्टोरेंट में पहुंचे।
जब उन्होंने नाश्ता समाप्त कर लिया और वेटर बिल ले आया, तब उन्होंने भुगतान के अलावा पांच डालर बतौर टिप टृे में रख दिए।


वेटर ने टिप तो ले लिया पर उसके मुंह पर आया हुआ आश्चर्य का भाव गेटस की दृष्टि से ओझल न रह सका।

उसी को भांपते हुए उनहोंने पूछा–क्या कोई खास बात है?
वेटर ने कहा– जी, अभी दो दिन पहले की बात है इसी मेज पर आपकी बेटी ने लंच किया और मुझे बतौर टिप पांच सौ डालर दिये थे और आप उनके पिता दुनिया के सबसे अमीर आदमी होने के बावजूद मुझे केवल पांच डालर दिये हैं।
मुस्कुराते हुए गेटस बोले– हां, क्योंकि वह दुनिया के सबसे अमीर व्यक्ति की बेटी है और मैं एक लकडहारे का बेटा हुं।
............... मुझे अपना अतीत सदा याद रहता है,
क्योंकि वह मेरा सर्वोत्तम मार्गदर्शक है।

=========================================================================
========================================================================
 परीस

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड

येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा

दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण

त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग

तो फेकून द्यायचा....

शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि

तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या

गळ्यातील साखळीकडे गेले...

ती साखळी सोन्याची झाली होती.....

दगड

घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे

लक्षच गेले नाही....


तात्पर्य:

प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी
परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या
नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी
प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत
असतो... आणि आपल्यातल्या
लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही
असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......

पण फार कमी
लोक या परीसाला ओळखू शकतात .......


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 स्वार्थी लोक
 एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते.

त्यांपैकी एक म्हणाला, 'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?' तेव्हा कोळी म्हणाला, 'मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे की, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे.'

तात्पर्य - काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुस-याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 
सदाचार
महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडतांना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडतांना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’
राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.
तात्पर्य :मुलांनो, सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही !
----------------------------------------------------------------------------------------------------------
 स्वतःच्या चुका सुधारा
एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,



मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?

फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.

मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.

फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.

मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.

फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).


तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर...



मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद

दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?

मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.



तात्पर्य :-





) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाच फुल कधीच कोमजणार नाही.

) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीच होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, वआपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीच आहे.
==========================================================================



सुखी रहने के लिए दूसरों में नहीं देखनी चाहिए ये बातें

 पुराने समय की बात है एक गुरुकुल के आचार्य अपने शिष्य की सेवा भावना से बहुत प्रभावित हुए। शिक्षा पूरी होने के बाद शिष्य को विदा करने का समय आया, तब गुरु ने शिष्य को आशीर्वाद के रूप में एक ऐसा दर्पण दिया, जिसमें व्यक्ति के मन के छिपे हुए भाव दिखाई देते थे।
शिष्य उस दर्पण को पाकर बहुत प्रसन्न हुआ। शिष्य ने परीक्षा लेने के लिए दर्पण का मुंह सबसे पहले गुरुजी की ओर ही कर दिया। शिष्य ने दर्पण में देखा कि उसके गुरुजी के मन में मोह, अहंकार, क्रोध आदि बुरी बातें हैं। यह देखकर शिष्य को दुख हुआ, क्योंकि वह अपने गुरुजी को सभी बुराइयों से रहित समझता था।
शिष्य दर्पण लेकर गुरुकुल से रवाना हुआ। उसने अपने मित्रों और परिचितों के सामने दर्पण रखकर परीक्षा ली। शिष्य को सभी के मन में कोई न कोई बुराई दिखाई दी। उसने अपने माता-पिता की भी दर्पण से ली। माता-पिता के मन में भी उसे कुछ बुराइयां दिखाई दीं। यह देखकर शिष्य को बहुत दुख हुआ और इसके बाद वह एक बार फिर गुरुकुल पहुंचा।

गुरुकुल में शिष्य ने गुरुजी से कहा कि गुरुदेव मैंने इस दर्पण की मदद से देखा कि सभी के मन में कुछ न कुछ बुराई जरूर है। तब गुरुजी ने दर्पण का रुख शिष्य की ओर कर दिया। शिष्य ने दर्पण में देखा कि उसके मन में भी अहंकार, क्रोध जैसी बुराइयां है।
गुरुजी ने शिष्य को समझाते हुए कहा कि यह दर्पण मैंने तुम्हें अपनी बुराइयां देखकर खुद में सुधार करने के लिए दिया था, दूसरों की बुराइयां देखने के लिए नहीं। जितना समय दूसरों की बुराइयों देखने में लगाया, उतना समय खुद को सुधारने में लगाया होता तो अब तक तुम्हारा व्यक्तित्व बदल चुका होता।
हमारी सबसे बड़ी कमजोरी यही है कि हम दूसरों की बुराइयां जानने में ज्यादा रुचि दिखाते हैं। जबकि खुद को सुधारने के बारे में नहीं सोचते हैं। हमें दूसरों की बुराइयों को नहीं, बल्कि खुद की बुराइयों को खोजकर सुधारना चाहिए। तभी जीवन सुखी हो सकता है।
========================================================================

एक शिल्पकार भ्रमंती करत बद्रिकेदारला पोचला. तो रात्री मुक्कामासाठी एका मंदिरात उतरला. कडाक्‍याची थंडी पडल्याने तो गारठला. मंदिरात लाकडं पडलेली होती. शिल्पकारानं त्यांतील मोठा तुकडा उचलला व तो पेटवला. शेकोटीमुळे त्याला ऊब मिळाली. तेवढ्यात मंदिरातील पुजारी तिथं आला. जळत असलेला लाकडाचा तुकडा पाहून पुजारी त्याच्यावर भडकला. त्याला शांत करत शिल्पकार म्हणाला, ""अहो, मी देवाला कसा जाळीन? देव तर मंदिरातील गाभऱ्यातच आहे. मी केवळ लाकूड जाळलं.‘‘

""तू नास्तिक आहेस. देवाला जाळलं आणि पुन्हा तोंड वर करून समर्थन करतोस?‘‘ असं म्हणत पुजाऱ्यानं शिल्पकाराला धक्के मारत मंदिराबाहेर हाकललं. शिल्पकार देवळाबाहेर एका दगडावर बसला. थंडीमुळे त्याला झोप येत नव्हती. त्यानं आपल्या थैलीतून छिन्नी काढली व रात्रभर त्या दगडावरच काहीतरी करत राहिला. सकाळी तोच पुजारी देवळात आला व पूजेनंतर नारळ फोडण्यासाठी तो बाहेर आला. शिल्पकार दगडाजवळ बसला होता. पुजाऱ्यानं त्याच्याकडे रागानं पाहून हातातील नारळ दगडावर फोडला. शिल्पकार एकदम ओरडला, ""अहो, हे काय केलं? तुम्ही माझ्या देवाचं डोकं फोडलं. तुम्ही पाखंडी आहात.‘‘ शिल्पकारानं रात्रभर ज्या दगडावर एक सुंदर मूर्ती कोरली होती तो मंदिरातील प्रसादाचा नारळ फोडण्याचा दगड होता. पुजारी म्हणाला, ""इतकी वर्षं या दगडावर नारळ फोडतो आहे, नाक, तोंड, डोळे काढल्यावर तो देव झाला?‘‘

शिल्पकार म्हणाला, ""रात्रीच्या लाकडामध्ये देवत्व होतं, तर दगडात कोरलेल्या मूर्तीमध्ये का नाही? पुजारी महाशय, जिथं भाव तिथं देव. काल जगण्यासाठी मला लाकूड जाळणं गरजेचं होतं. त्या वेळी तोच माझा ईश्‍वर होता.‘‘

प्रतिकात्मकतेपेक्षा परिस्थितीनुरूप अवलंबलेला प्रत्यक्ष भाव व कृती महत्त्वाची.  

==========================================================================
==========================================================================
श्रीमंतीची धुंदी

श्रीरंग व अशोक हे जिवलग मित्र. एकमेकांना कधीही अंतर न देणारे. शाळेत एकाच वर्गात शिकायचे, एकाच बाकावर बसायचे, एकत्रच डबा खायचे. त्यांची मैत्री अतिशय घट्ट होती. मात्र परिस्थितीमुळे श्रीरंग पुढे शिकू शकला नाही व वडिलांना शेतीकामात मदत करू लागला. अशोक मात्र खूप शिकला. मोठा झाला आणि उच्च शिक्षणासाठी परगावी गेला. दोघा मित्रांची ताटातूट झाली. काही वर्षांनंतर मोठ्या पदापर्यंत पोचलेला अशोक बढती मिळून श्रीरंगच्या गावाजवळच्या शहरात राहायला आला. आपला मित्र अशोकला सरकारदरबारी मोठी बढती मिळाल्याचं ऐकून श्रीरंगला आनंद झाला. त्यानं अशोकला भेटायला जायचं ठरवलं. अनेक वर्षांनंतर मित्र भेटणार असल्यानं तो भेटीसाठी उतावळा झाला होता. पण प्रत्यक्षात तो अशोककडे गेला तेव्हा आपल्या बडेजावाच्या धुंदीत असलेल्या अशोकनं श्रीरंगला ओळखही न दाखवता बेफिकिरीनं विचारलं, ""भेटीची वेळ न ठरवता खुशाल घुसलात इथं? कोण तुम्ही?‘‘ अशोकचा हा उद्धटपणा पाहून थक्क झालेला श्रीरंग दुखावला. अजिबात न चिडता तो शांतपणे म्हणाला, ""मी कोण हे सांगण्याची पाळी आली खरी. पण ऐका आता, मी परिस्थितीनं गरीब असा तुमचा जुना मित्र आहे. तुम्हाला अलीकडं नीट दिसेनासं झालंय असं ऐकलं, म्हणून समक्ष भेटायला आलो होतो. पण जुन्या मित्राचीही ओळख न पटण्याएवढा तुमचा आजार बळावला असेल, असं वाटलं नव्हतं. देव करो आणि तुमची धुरकटलेली दृष्टी लवकर सुधारो! बराय, येतो मी. आगंतुकपणाची माफी असावी.‘‘ हे बोलून झाल्यावर श्रीरंग तडक निघून गेला. आजूबाजूच्या मंडळीच्या रोखलेल्या नजरांपासून आपला ओशाळलेला चेहरा लपवता लपवता अशोकरूपी बड्या असामीची पुरेवाट झाली!
श्रीमंतीची धुंदी डोळ्यांवर चढू न देणंच श्रेयस्कर.==============
===================================================================

 जॉर्ज बर्नार्ड शॉ

जॉर्ज बर्नार्ड शॉ हे जगविख्यात ब्रिटिश नाटककार. ब्रिटिश असूनही ब्रिटिश राजसत्तेला तुच्छ लेखणारा हा कलंदर साहित्यिक. "फेअरवेल टू आर्म्स‘ हे त्यांचं गाजलेलं नाटक. "माय फेअर लेडी‘ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या "पिगमॅलियन‘ या नाटकावर आधारलेला आहे. हजरजबाबीपणा आणि विनोदाचं उत्तम अंग ही शॉ यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये.

एकदा अर्नोल्ड बेनेटन हा कादंबरीकार शॉ यांना भेटायला त्यांच्या घरी गेला. शॉ यांना फुलांची खूप आवड आहे, हे अर्नोल्ड ऐकून होते. त्यांच्या घरात फुलं असणारच असं गृहीत धरून अर्नोल्ड यांनी शॉ यांच्या घरात पाऊल ठेवलं. आणि साहजिकच त्यांची नजर इकडे तिकडे भिरभिरत राहिली. पण घरात कुठेच एकही फुलदाणी नव्हती. अर्नोल्ड खूपच आश्‍चर्यचकित झाले. न राहवून ते शॉ यांना म्हणाले, ""मी ऐकलं होतं की तुम्हाला फुलांचं खूप वेड आहे. पण तुमच्या घरात तर एकही फुलदाणी मला दिसली नाही. मला जरा नवल वाटलं.‘‘

अर्नोल्ड यांचं हे बोलणं ऐकून क्षणाचाही विलंब न लावता शॉ म्हणाले, ""तुम्ही जे ऐकलंय त्यात काहीच चूक नाही. मला फुलांचं वेड आहे, हे अगदी बरोबर आहे. पण त्यासाठी मी फुलांच्या मुंड्या कापत नाही आणि त्या कापलेल्या मुंड्या फुलदाणीत उभ्या करून माझ्या वेडाचं प्रदर्शनही मांडत नाही.‘‘ हे ऐकून अर्नोल्ड काय समजायचं ते समजले. शॉ यांचा हजरजबाबीपणाही त्यांच्या लक्षात आला. त्याचबरोबर खरा रसिक आवड जपताना किती बारीक विचार करतो, हेही त्यांच्या लक्षात आलं.
 #############################################################################
################################################################################

    गुरु-शिष्य समज गैरसमज

""बाळा, माझी बंदिश विकून किती पैसे मिळवलेस?‘‘ उस्ताद अमीर खॉंसाहेब आपल्या शिष्याला विचारत होते. या प्रश्‍नानं तरुण शिष्य गोंधळून गेला. कारण, खॉंसाहेबांच्या गायकीचे आणि संगीतावरच्या निष्ठेचे संस्कार त्या शिष्यावरही झाले होते. खॉंसाहेबांनी पुन्हा एकदा विचारल्यावर शिष्य घाबरत घाबरत म्हणाला, ""गुरुजी, मी असं काहीच केलं नाहीये.‘‘ खॉंसाहेब एकदम उठले आणि त्यांनी ग्रामोफोनवर एक रेकॉर्ड लावली. ""हे गाणं माझ्या ज्या बंदिशीवर बेतलंय ती बंदिश तुझ्या-माझ्याखेरीज कुणालाच माहिती नाही. मग ती बाहेर पोचलीच कशी? उद्यापासून तू माझ्याकडं गाणं शिकायला यायचं नाहीस.‘‘ ते कडाडले.

गुरूच्या शब्दातला अंगार पाहून तो हात जोडून गुरुजींना म्हणाला, ""मी खरंच नाही विकलेली ही बंदिश.‘‘ ""मग कुणाला ऐकवली होतीस का ती? पण मी तुला तेही करायचं नाही हे बजावलं होतं,‘‘ खॉंसाहेब म्हणाले. गुरुजींचे हे शब्द ऐकल्याक्षणी शिष्याच्या डोक्‍यात लख्ख प्रकाश पडला. एका संगीतकाराबरोबर गाडीनं जात असताना गप्पांमध्ये त्यानं या शिष्याला नव्या बंदिशीबद्दल विचारलं होतं. यावर अभावितपणे शिष्यानं दोन-चार ओळी नुसत्या गुणगुणल्या होत्या. तो किस्सा सांगून यापलीकडं काही केलं नसल्याचं शिष्यानं काकुळतीनं सांगितलं. खॉंसाहेब म्हणाले, ""बेटा, ज्यानं नुसतं तुझं गुणगुणणं ऐकून ही चाल बांधली तो किती हुशार माणूस असेल बघ. मात्र, या गोष्टीचा खरेखोटेपणा सिद्ध होईपर्यंत तू माझ्याकडं यायचं नाहीस.‘‘ सहा महिन्यांनी शिष्य पुन्हा अमीर खॉंसाहेबांकडं गेला. शिष्यानं जाणूनबुजून काही केलं नसल्याची खात्री त्यांनी तोवर करून घेतली होती. त्यामुळं त्यांचा राग शांत झाला होता. मग गुरू-शिष्याची मैफल पुन्हा जमली. गुरूप्रमाणंच कलानिष्ठ असा तो शिष्य म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

                                                 आत्मविश्वास आणि एकाग्रता
ही गोष्ट आहे 1999मधील. श्रीलंका आणि भारत यांच्यातल्या एक दिवसांच्या सामन्यांची मालिका सुरू होती. कोलंबोमधील सामन्याच्या वेळी घडलेला हा प्रसंग. त्या वेळी अंशुमन गायकवाड भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री त्यांना दुसऱ्या दिवशीचा सामना फिक्‍स असल्याची कुणकूण लागली. त्यामुळे ते विलक्षण अस्वस्थ होते. सामना भारत हरणार असल्याचा निकाल निश्‍चित झाला होता. मॅच फिक्‍सिंगचा धोका जाणवून ते धास्तावले. पण काय करावं हे त्यांना सुचेना. शेवटी ते उठले आणि सरळ सचिन तेंडुलकरच्या खोलीत गेले. त्या वेळी सचिन कर्णधार नव्हता, तरीही त्यांना सचिनचा सल्ला घ्यावासा वाटला. सचिन झोपला होता. दार वाजल्यावर तो उठला. अंशुमन गायकवाडांना अशा विचित्र वेळी समोर पाहून त्याला जरा आश्‍चर्य वाटलं, मात्र सचिननं त्यांना आत बोलावलं. गायकवाडांची अस्वस्थता त्याच्या लक्षात आली. मात्र नेमकं काय झालंय हे कळायला मार्ग नव्हता. ""उद्याचा सामना फिक्‍स झालाय असं माझ्या कानावर आलंय. आपण हरणार आहोत आणि श्रीलंका जिंकणार आहे, असा निकाल निश्‍चित झाल्याचं मला कळलंय,‘‘ गायकवाड यांनी सांगितलं. हे ऐकलं आणि सचिनच्या चेहऱ्यावरचा ताण क्षणार्धात मावळला. ""तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्याचा सामना आपणच जिंकतोय. तुम्ही कसलाही विचार न करता शांतपणे झोपा,‘‘ सचिन त्यांना म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सचिन नेहमीच्या आत्मविश्‍वासानं मैदानावर उतरला. त्यानं एकाग्रतेनं खेळत शतक झळकावलं आणि मुख्य म्हणजे भारतानं तो सामना जिंकला. गायकवाड यांना दिलेला शब्दही सचिननं पाळला. फिक्‍सिंगच्या बातमीनं किंचितही विचलित न होता शांतपणे खेळणं आणि देशाला विजय मिळवून देणं हे सचिनचं कर्तृत्व असामान्य म्हणावं लागेल. 

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$



                                                                विहरीचे लग्न
 
एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो
तुझी मला मुळीच गरज नाही .बिरबल अतिशय स्वाभिमानी होता .तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला .आणि एका गावात वेश बदलून राहू लागला
बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही .बादशाहाला मात्र सारखी त्याची उणीव भासे त्याची कामे अडून राहू लागली
आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहाला त्याच्या शिवाय करमत नव्हते .अन्न गोड लागत नव्हते .त्याने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला
परंतु बिरबल सापडत नव्हता बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला .बादशाहने हि बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले
होते .त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली .राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.
लग्न समारंभ थाटात होणार आहे .तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरी सह उपस्थित रहावे .जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड
केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना .बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोक हि चिंतेत पडले होते गावाच्या पुढारी ना या
समस्येला कसे तोंड ध्यावे  समजत नव्हते ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली .अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकरी ना जाण्याची युक्ती सांगितली .गावकरी खुश झाले .एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून
दिल्ली ला गेले दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले खाविंद आपल्या आध्ने प्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत .आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत .तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे .त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि
ओरडला बिरबल सापडला !बादशहा म्हणाला  अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही तुम्हीच प्रथम हजर झाला .तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली ? एका शेतकऱ्याने महाराज गावकऱ्यांनी नम्र पने उत्तर दिले .तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले .
ताबडतोब त्याने माणसाबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठून बिरबला राजधानीत सम्माने आण्याचा हुकुम दिला .बिरबल बादशाच्या महालात आला .
आणि त्याने बिरबलाल मिठी मारली .

-------------------------------------------------------------------------------------------------------------
----===---------------=-==============------------------------=----------------=--------------------





एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.

दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.

द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोरीचा गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं.

चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?'
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.


झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!
तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू?

राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.

त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.
तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.
==============================================================================
================================================================================

0 टिप्पणी(ण्या):

Post a Comment