कथा आईनस्टाईनची
अल्बर्ट आईनस्टाईन लहानपणी शिक्षणाच्या बाबतीत फारच विरक्त होते. त्यांना शाळेत जाणे आणि शिकणे अजिबात आवडत नव्हते. जेव्हा शाळेचे शिक्षक अल्बर्ट यांना एखाद्या विषयाबाबत आठवायला सांगत तेव्हा त्यांना तो विषय आवडत नसे. त्यांना तर चिंतन मनन करणे आवडायचे. एका विषयावर विचार करत असताना ते तासनतास घालवत असत. त्यावेळी त्यांना शिक्षकांच्या शिक्षेस सामोरे जावे लागत असे. एकेदिवशी अल्बर्टने आपल्या आईवडीलांना सांगितले की, मी आता शाळेत जाणार नाही. आईने कारण विचारले, तेव्हा छोटा अल्बर्ट म्हणाला,''आई तेथे शिक्षण नाही तर पोलिस शिकवतात, छोट्या छोट्या कारणावरून रागवतात, मला ते सहन होत नाही आणि गणित विषय हा तर मला खायला उठतो.'' तेथेच अल्बर्टचे काका जेकब बसलेले होते ते त्याची गोष्ट ऐकून म्हणाले,'' बेटा, हे काय सांगत आहेस की तुझे मन गणितात लागत नाही, मग तुझे खेळातही मन लागत नाही का.'' अल्बर्ट म्हणाला'' खेळात तर माझे मन लागते'' जेकब म्हणाले,'' तर ये मग, आपण चोर पोलीस खेळूया'' जेकबने काही रेषा काढल्या आणि गोटया सरकावू लागले. अल्बर्ट यांची खेळातली आवड आणि कौशल्य पाहून जेकब म्हणाले,'' हेच तर बीजगणित आहे त्यात संख्यांचा शोध घ्यावा लागतो.'' अल्बर्ट म्हणाला,'' काका, हेच गणित आहे, यात अवघड असे काहीच नाही, असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे''
तात्पर्य
विषय सोपा करून सांगणे ही शिक्षकाची आवड असली पाहिजे. शिक्षकांनी सोपे करून सांगितल्यास विद्यार्थ्याना लगेच समजते. पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास मुले नवीन कल्पना स्वीकारू लागतात व त्यातून चांगला परिणाम मिळतो.
🔘🔘🔘🔘
आजची बोधकथा
" एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.
नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.
मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’
तात्पर्य -एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.
सम्राट आणि साधू
एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत
असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू
जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते
तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला
वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी
त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा
तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात
जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत
मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे
मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने,
सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य
समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते
पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात
मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे
मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा
स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून
मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास
तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा
त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.
तात्पर्य
मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार
यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून
आपले संरक्षण होते.
आयुष्याची खरी किंमत
एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला
" आयुष्याची खरी किंमत काय
असते हो? "
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले
" ह्या अगोदर तू ह्या दगडाची
खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची
फक्त किंमत काढून ये , विकू
नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला
त्या दगडाची किंमत विचारली .
तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी
तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू
शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक
भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या
दगडाची किंमत विचारली
- " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण
पोते भरून बटाटे देऊ शकतो. "
पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे
दगड विकू शकत नसल्याबद्दल
त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला
एका सराफाचे दुकान लागले. आत
जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून
त्याची किंमत विचारली. आपल्या
भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो
सराफ उत्तरला - " या खड्यासाठी
मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य
वाटले पण
नातवाने
आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी
मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला
अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी
विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या
रत्नपारख्यास दाखवला. तो
रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने
अलगद तो दगड एका मखमली
कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती
प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "
अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे
अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची
किंमत तुम्हाला देऊ नाही
शकणार ."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या
मनःस्तिथीत तो
आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून
आजोबा म्हणाले - " मला वाटते
फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या
उत्तरावरून तुला
आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही
जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा
असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या
सीमित समजुती, आकलनशक्ती,
हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे
आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.
स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही
निरर्थक तुलने मध्ये गुंतू
नका. कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि
अद्वितीय निर्मिती आहेत.
तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या
आयुष्याची खरी किंमत आहे .
आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून
स्वतःवर प्रेम करायला शिकू....
५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५५
लुगड्याची गोष्ट .
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........मग सावित्री असे का बरं बोलली?..........तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते,त्यांची भेट घेतली.आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं.. सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!
आपणही त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम करू या... कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..
****************************************************
##################################################################################

महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली.गुरू द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांना ठार मारणार्यांच्या बाजूने तुम्ही कसे काय उभे राहिलात ?
कृष्णाने उत्तर दिले "ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही,पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले"
रुक्मिणीने विचारले "कोणते पाप??"
कृष्ण म्हणाला "जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते.दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सत्यमार्गी जगण्याला अर्थहीन करण्यास पुरेसा आहे."
रुक्मिणीने विचारले "मग कर्णाचे काय?"
कृष्ण म्हणाला, "कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही.त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही,पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते, पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही,म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला."
तात्पर्य : तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.
महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली.गुरू द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांना ठार मारणार्यांच्या बाजूने तुम्ही कसे काय उभे राहिलात ?
कृष्णाने उत्तर दिले "ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही,पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले"
रुक्मिणीने विचारले "कोणते पाप??"
कृष्ण म्हणाला "जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते.दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सत्यमार्गी जगण्याला अर्थहीन करण्यास पुरेसा आहे."
रुक्मिणीने विचारले "मग कर्णाचे काय?"
कृष्ण म्हणाला, "कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही.त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही,पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते, पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही,म्हणून कर्णाने मरणपंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला."
तात्पर्य : तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.






0 टिप्पणी(ण्या):
Post a Comment